Friday, October 16, 2015

“शिव शक्ति संगम”च्या स्थानावर भूमिपूजनाचा कार्यक्रम




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाशी आपण परिचित आहात. 

गेली ९० वर्षे संघ हिंदू समजाच्या संघटनेचे कार्य करीत आहे. 
संघाच्या प्रेरणेने समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात संघ स्वयंसेवकांनी रचनात्मक कामे हाती घेतली आहेत. समाजातील सज्जनशक्ती एकत्र आली व तिचे विराट दर्शन घडले तर आपला धर्म, आपला समाज व आपल्या संस्कृती पुढील सर्व प्रश्न सुटतील असा विश्वास गेल्या ९० वर्षात संघाने निर्माण केला आहे. 

अशा सज्जनशक्तीचे विराट दर्शन घडविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील पूर्ण गणवेशातील संघ स्वयंसेवकांचे सांघिक “शिव शक्ति संगम” रविवार ३ जानेवारी २०१६ रोजी मारुंजी (हिंजवडी जवळ, पुणे) येथे संपन्न होणार आहे. 
ज्यास संघाचे पू. सरसंघचालक श्री. मोहन भागवत हे मार्गदर्शन करणार आहेत.

ह्या “शिव शक्ति संगम”च्या स्थानावर भूमिपूजनाचा कार्यक्रम संघाचे अखिल भारतीय सरकार्यवाह मा. श्री भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत आणि प.पू स्वामी स्वरुपानंद सरस्वती, श्रुति सागर आश्रम, फुलगाव, जि. पुणे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. 

हा कार्यक्रम मारुंजी गाव, हिंजवडी आयटीआय जवळ पुणे येथे रविवार १८ ऑक्टोबर २०१५ सकाळी ८ ते ९ ह्या वेळात होणार आहे.

भूमिपूजनातून समरसतेचा संदेश:- ज्या समाजात पौरहित्य करण्यासाठी कोणी जात नाही अशा मोची आणि मातंग समाजातील पौरहित्याचे प्रशिक्षण घेतलेले सोलापूर, नगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २५ ते ३० वयोगटातील १० तरुण ह्या भूमिपूजनाच्या प्रसंगी पौरहित्य करणार आहेत.


4 comments:

  1. What a wonderful program it was ! Very well planned and Organized. Looking forward for grand success of 3 Jan 2016

    ReplyDelete
  2. @All, हर एक शब्द सुनो, समझो, सोचो, कृती करो...........
    भारत के हर एक घर में बजना चाहिये ये और ऐसे गाने.........................
    हरी ॐ!!!

    https://www.facebook.com/Hariaom/videos/10205190597109807/?pnref=story

    ReplyDelete
  3. निरीक्षण यह है की शाखा की संख्या घट रही हैं. संदेश यह है की हर गली, गृहनिर्माण संस्था, शाम के समय मंदिर, शाला यहापे शाखा शुरू हो. भगवद् ध्वज लहराए, प्रार्थना हो, पद्य हो, संस्कार हो, शिक्षण हो, विकास हो, भारत महान हैं, और रहे. जय माँ भारती! हरी ॐ!!!

    ReplyDelete
  4. I am verey happy!like this program.organizetion,development ,sequence
    in well,goodmanner ,its helps to all humankind.thank you very much.I hope everyone strugle to make unity,to make INDIA,to make community,to make hindutva,to high devloped hiduism.best wishes for activities you carry from DEORE family Nasik maharashtra 7276787510

    ReplyDelete